नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा शनिवारी सायंकाळी 10654 दलघफू (96.51 टक्के) झाला आहे. पाणलोटात पाऊस काहीसा वाढल्याने आज-उद्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
पाणलोटात पाऊस कमी झाल्याने चारपाच दिवसांपासून आवक कमालीची घटली होती. पण कालपासून पावसाचा जोर काहीसा वाढलेला आहे.
त्यामुळे भंडारदरात 156 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 10654 दलघफू (96.51 टक्के) झाला आहे. भंडारदरात काल दिवसभर अधूनमधून सरी कोसळत होत्या. या पावसाची नोंद 21 मिमी झाली आहे.
पाणलोटात पाऊस काहीसा वाढल्याने आज-उद्या हे धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे (11039 दलघफू) तुडूंब भरण्याची शक्यता आहे
