संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे गेल्या वर्षभरात सरपंच निलम ढेंबरे व उपसरपंच आण्णा कढणे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहे.
तसेच अजूनही विकासकामांचा शुभारंभ सुरू आहे. नुकतेच पिंगळे वस्ती या ठिकाणी सीडीवर्क, तसेच दलीत वस्तीसाठी पाण्याची टाकी व अंजनिगड येथे सार्वजनिक सौचालयाचे युनिट कामांचा शुभारंभ सरपंच निलम ढेंबरे व उपसरपंच आण्णा कढणे यांच्या हस्ते करण्यात आलाय.
यावेळी शुभारंभ प्रसंगी पांडुरंग भोसले, बबलू शेंडगे, अमोल गळंगे, आण्णा ढेंबरे, भानुदास ढेंबरे, पांडुरंग ढेंबरे, लक्ष्मण ढेंबरे, पांडुरंग कोळपे, रामदास डोमाळे, संतोष सागर, लक्ष्मण कारंडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते
