शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार…..?, राज्याच्या राजकारणात खळबळ 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यात राज्यातील एका बड्या नेत्यानं या दोन्ही नेत्यांसंदर्भात मोठा दावा केला आहे.

शरद पवार आणि अजित पवार हे भविष्यात एकत्र येऊ शकतात, असं भाकित या नेत्यानं केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाची चर्चा देश पातळीवरही सुरू आहे. अजित पवारांचा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा, शपथविधी, खातेवाटप आणि आता शरद पवार आणि अजित पवार यांची भेट हे मुद्द्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

त्यात दिल्लीतून शरद पवारांना ऑफर असल्याचा दावा राज्यातील काँग्रेसच्या नेत्याने केल्यानं खळबळ उडाली होती. मात्र, अशा चर्चांना काही अर्थ नाही, असं आधीच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही भेट आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे.

शरद पवारांबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘समुद्राची खोली मोजता येईल; मात्र शरद पवार यांची बुद्धी मोजता येत नाही. भाजप शरद पवार यांना आपल्या दबावाखाली ठेवणार की शरद पवार हे भाजपला दबावाखाली ठेवतील हे सांगता येत नाही.’

Leave a Comment