भाऊसाहेब वाकचौरेंनी पक्षप्रवेश करताच उद्धव ठाकरे म्हणाले…..

शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून वाकचौरे यांनी पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत संपूर्ण मातोश्री परिसर दणाणून सोडला. वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची नगर जिल्ह्यातील ताकद वाढली आहे.

वाकचौरे यांनी पक्षात प्रवेश करताच उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप आणि शिंदे गटावर हल्ला चढवला. काही पापी लोक शिवसेना संपवायला निघाले आहेत. शिवसैनिक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. वाकचौरे परत शिवसेनेत आलेत. शिवसेना सोडल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे.

चुकीला माफी आहे, परंतु पाप करणाऱ्यांना मात्र गाडायचे आहे. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे, आमचे शिवसैनिक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Leave a Comment