देशात पुढील वर्षात लोकसभेसह काही राज्यांमध्ये निवडणुका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकार मोठी भेट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांच्या सध्याच्या हप्त्यात वाढ होऊ शकते. फायनेन्शिअल एक्सप्रेसने याविषयीचे वृत्त दिले. पीएम किसान योजनेत वार्षिक 6000 रुपयांची वाढ होऊ शकते.
सध्या या योजनेतंर्गत तीन टप्प्यात 6000 रुपयांची मदत करण्यात येते. ही रक्कम वाढण्याची दाट शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम वाढवण्याची मागणी केली होती.
या रक्कमेत 50 टक्के वाढीची शक्यता आहे. म्हणजे 2000 रुपयांऐवजी योजनेचा हप्ता 3000 रुपये असेल. सध्या दोन हजार रुपये तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात.
देशात या वर्षांत चार राज्यातील विधानसभांच्या निवडणुका आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्यात निवडणुक आहेत. त्याअगोदर या विषयीची घोषणा होऊ शकते.
