केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
याबाबत भाजप खासदार सुजय विखे यांनी बोलताना म्हटलं की, जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावेल त्याचा प्रचार आम्ही करू. आम्हाला कोणाचीही अडचण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आदेश देतील तोच खासदार होईल असं विखे यांनी म्हटलं आहे.
