सत्यजित तांबे म्हणाले, काँग्रेसमधील ‘त्या’ लोकांनी मला पक्षाच्या बाहेर….

नाशिक विधान परिषद निवडणुकीतील वाद अजून शांत झालेला नाही. कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले आमदार सत्यजित तांबे यांनी पुन्हा चर्चेला तोंड फोडले आहे. पक्षातील काही लोकांनी मला पक्षाच्या बाहेर काढले? असा आरोप त्यांनी केला आहे.

यामुळे काँग्रेसमध्ये ते झारीतील शुक्राचार्य आहेत तरी कोण? ही चर्चा सुरु झाली. पुणे शहरात माध्यमांशी बोलताना आमदार तांबे यांनी काँग्रेसमधील वाद आणि अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यासंदर्भात भाष्य केले.

काँग्रेसमधील काही ठराविक लोकांनी टार्गेट करुन मला पक्षाच्या बाहेर ढकलले आहे. परंतु आमच्या रक्तात काँग्रेस आहे. आमच्या विचारात काँग्रेस आहे. शंभर वर्षांपासून आम्ही काँग्रेससोबत जोडले गेले आहोत. मला काही लोकांनी बाहेर ढकलले असेल तर ती पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की, माझ्यासारख्या लोकांशी संवाद साधला पाहिजे

Leave a Comment