अंगणवाडी सेविका, मदतनीसांची १७ हजार पदभरती 

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पोषण आहारात महत्वाची भूमिका असून गेल्या सहा वर्षापासून पोषण माह सप्ताह राज्यभरात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याच योगदानामुळे यशस्वी होतांना दिसत आहे.

राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.

त्या जिल्ह्यातील घोटी, तालुका इगतपुरी येथे राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

Leave a Comment