मोठी बातमी! कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश 

राजस्थानचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा यांनी आज (शनिवार, ९ सप्टेंबर) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. गुढा हे राज्यातील बडे नेते असून ते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे मानले जातात.

यावर्षी राजस्थानात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर, त्यांचा शिवसेनेतील प्रवेश कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जातोय.

Leave a Comment