लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा विषय असतो. लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेव दोघेही फार खुश असतात. अशात जकार्ता येथून एक अजब घटना लग्न समोर आली आहे.
यामध्ये नवरदेवाने लग्नातून पळ काढला. त्यामुळे नवरदेवाचे वडिल लग्नासाठी उभे राहिले. त्यांनी आपल्या होणाऱ्या सुनेसोबत विविह केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तरुण आणि तरुणी दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. पुढे कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या घरच्यांनी लग्नाची जबरदस्त तयारी केली.
मांडव सजला. नवरदेव आपले वऱ्हाडी घेऊन मंडपात आला. काही वेळात काय घडलं ते समजलं नाही. मात्र नवऱ्या मुलाने लग्नाला नकार दिला आणि भरमंडपातून तो पळून गेला. मंडपातून नवरा पळाल्याने एकच चर्चा सुरू झाली.
असे घडल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांची बदनामी होणार. या मुलीशी पुन्हा कोण लग्न करणार? असे विचार सासऱ्याच्या मनात आले. मुलीच्या कुटुंबीयांनी या लग्नासाठी बराच खर्च केला होता.
हे सर्व वाया जाऊनये म्हणून सासऱ्याने आपल्या होणाऱ्या सुनेशी विवाह करत तिला आपली पत्नी बनवलं आहे. इंडोनेशियामधील जकार्तामध्ये ही घटना घडली आहे
