नाशिक – पुणे महामार्गावरील चंदनापूरी शिवारात भीषण अपघात, १ जागीच…

संगमनेर (Sangamner) तालुक्यातून जाणार्‍या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Nashik Pune Highway) चंदनापुरी शिवारातील आनंदवाडी येथे टेम्पोचे चाक थेट दुचाकीस्वाराच्या छातीवरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी पावने नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे वरूडी पठार गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संदीप मारूती जाधव (वय 33 रा. वरूडी पठार) हा तरूण मंगळवारी सकाळी चंदनापुरी शिवारातील आनंदवाडी शिवारात आला.

त्याच दरम्यान टेम्पो चालक लहु सुधाकर दहीफळे (रा. लातुर) याने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात जाधव हा तरूण खाली पडला आणि त्याच्या छातीवरून चाक गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Leave a Comment