Shivaji Kardile : अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डीले

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (Ahmednagar District Central Cooperative Bank) नवा अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार शिवाजी कर्डीले (Shivaji Kardile) यांची निवड झाली आहे.

दरम्यान बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपद राष्ट्रवादीला (NCP) व उपाध्यक्षपद काँग्रेसला (Congress) दिले गेले. त्यावेळी महानगर बँकेचे अध्यक्ष व युवा नेते अ‍ॅड. उदय शेळके (Uday Shelke) यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. पण दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती.

या संचालक मंडळात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) बहुमत असूनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी बाजी पलटवत माजी मंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांना पुन्हा एकदा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळवून दिले आहे. कर्डिले यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव केला.

Leave a Comment