जवखेडे खालसा येथील शेतकरी पाणी वापर संस्थेच्या चेअरमन व व्हा.चेरमनपदी यांची बिनविरोध निवड

अहमदनगर(DSNews24/सुनिल नजन) नवीन अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथिल शेतकरी पाणी वापर संस्थेच्या चेरमनपदी कोपरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेशराव एकनाथराव आव्हाड यांची तर व्हाईस चेरमनपदी जवखेडे खालसा येथील मुस्लिम समाजाचे नेते बादशहा उस्मानभाई शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मुळा पाटबंधारेच्या उजव्या कालव्यावरील जवखेडे शिवारातील मायनर क्रमांक ९ आणि आउटलेट क्रमांक १७ वर २३३ हेक्टर क्षेत्रासाठी ही शेतकरी पाणी वापर संस्था कार्यरत आहे. व्रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेरमन आणि विद्यमान संचालक उद्धवराव वाघ यांच्या नेतृत्वाखालील व्रुद्धेश्वर शेतकरी विकास पँनलचे सर्वच्या सर्व म्हणजे एकूण ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

विरोधी गटाचे सर्व उमेदवार झोपेत असतानाच व्रुद्धेश्वर शेतकरी पँनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी बाजी मारुन ही संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी अखेर यश मिळविले. या पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रात जवखेडे खालसा, कोपरे, वाघोली शिवारातील एकुण २३३ हेक्टर जमीनक्षेत्र ओलीताखाली येते.

मुळा पाटबंधारेचा उजवा शाखा कालवा हा बारामाही चालू असल्याने या भागातील शेतकऱ्यांना या मायनर चारीचा बाराही महीने फायदाच होतो. जमिनीतील पाण्याच्या पातळीत ही वाढ होते.

शेतकरी पाणीवापर संस्थेचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे

प्रभाग क्रमांक एक मधून बादशहा उस्मानभाई शेख,संभाजी बाबुराव वाघ,श्रीमती कडुबाई कारभारी मतकर, प्रभाग क्रमांक दोन मधून अँडव्होकेट वैभव पोपटराव आंधळे, भाउसाहेब मळूपाटील उघडे, सौ.गंगुबाई वसंतराव आव्हाड, प्रभाग क्रमांक तिन मधून विद्यमान चेरमन रमेशराव एकनाथराव आव्हाड, राजेंद्र गणपत उघडे, सौ. गयाबाई दिनकर आल्हाट इत्यादी नउ संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत.

चेरमन व्हाईस चेरमनपदाच्या रस्सीखेची मधे आव्हाड आणि शेख यांच्याच गळ्यात चेरमन ,व्हा.चेरमन पदाच्या विजयाची माळ पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुळा उजवा शाखा कालव्याचे माका शाखेचे शाखाधिकारी खर्से पी.एस.यांनी काम पाहिले. त्यांना कालवा निरिक्षक प्रियंका जाधव,किरण शिंदे, नजीर शेख यांनी विषेश सहकार्य केले. ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष चारुदत्त वाघ,अँड वैभव आंधळे, बाबासाहेब सरगड,शमशुद्दीन शेख यांनी विषेश प्रयत्न केले.

नवनिर्वाचित चेरमन, व्हाईस चेरमन आणि संचालक मंडळाचे यांचे जेष्ट नेते पोपटराव आंधळे, उद्ववराव वाघ,पाथर्डी मार्केट कमिटीचे सभापती सुभाष बर्डे, जवखेडे दुमालाचे उपसरपंच भास्कर पाटील नेहुल,जवखेडे दुमाला सोसायटीचे चेरमन कचरू पाटील नेहुल, व्हा चेरमन रमेश नरवडे, कोपरे गावच्या विद्यमान सरपंच सौ छायाताई उघडे, उपसरपंच नारायणराव वाघमोडे यांनी अभिनंदन केले आहे.

या शेतकरी पाणीवापर संस्थेमार्फत कोणत्याही प्रकारचा राजकीय भेदभाव न करता टेल कडून हेडकडे सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी दिले जाईल.आणि पाणीपट्टी वेळेवर वसुली करून भरणा केला जाईल असे नवनिर्वाचित चेरमन रमेशराव आव्हाड यांनी सांगितले.

Leave a Comment