राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आंदोलनाची धग अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा ताफा नांदेडमध्ये ( Nanded) सकल मराठा समाजाकडून अडवण्यात आला.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महाजन यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने महाजन हे शहरात आले होते.
नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यावर समोर सकल मराठा समाजाकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. काळे झेंडे दाखवून पालकमंत्री चलेजावच्या घोषणा देण्यात आल्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजीत शासकीय कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन नांदेडला आले होते.
दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात लोकप्रतीनिधी आणि पालकमंत्र्यानी सहभागी होऊ नये, असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला होता.
त्यामुळे आज सकाळपासूनच सकल मराठा समाजबांधव कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. तर, पालकमंत्र्यांचा ताफा येताच काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले.
