साकूरात महिलेचा विनयभंग, दोघांविरोधात गुन्हा दाखल 

संगमनेर(DSNews24/सतिश फाफाळे) तालुक्याच्या पठार भागातील साकुर गावातील बाजार पेठेत सव्वीस वर्षीय विवाहीत तरुण महिला लेडीज शॉपीचा व्यवसाय करत आहे. या लेडीज शॉपी दुकानावर जाऊन दोन तरुणांनी या महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करत तिचा विनयभंग केला. तर तिला व तिचे पतीस जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरूवार दि १४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे.

साकुर परिसरातील एका गावातील सव्वीस वर्षीय विवाहीत महिला आपला लेडीज शॉपी व्यवसाय बाजारपेठेत चालवत आहे.गुरूवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सदर महीलेस फोन करून काही मेकअप साहित्याची विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर तुषार पोपट खेमनर रा. हिरेवाडी ता. संगमनेर ही व्यक्ती लेडीज शॉपीवर आली.

असता सदर सव्वीस वर्षीय विवाहीत महिलेस म्हणाला की माझे तुझ्यावर प्रेम आहे.तू माझेशी फ्रेंडशिप कर. मी तुला माझे सोबत लॉजवर घेऊन जातो.असे म्हणाला असता सदर महीला त्यास समजावून सांगत असताना तो तीस म्हणाला की तू मला एक किस दे असे म्हणून तीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

यादरम्यान त्याचे सोबत आलेला शिवाजी सयाजी खेमनर रा. हिरेवाडी ता.संगमनेर व तुषार खेमनर हे दोघे महिलेस म्हणाले की घडले प्रकाराबाबत तू कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या नवऱ्याला संपवून टाकीन अशी धमकी दिली. सदर व्यावसायिक सव्वीस वर्षीय विवाहीत महिलेच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलिसांत तुषार खेमनर व शिवाजी खेमनर यांचे विरुद्ध विनयभंग व धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शन नुसार पो. हे. कॉन्स्टेबल जी.पी. लोंढे करतं आहे.

यादरम्यान पठार भागातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून साकुर गावाकडे पाहिले जाते.येथे प्राथमिक शाळा, विद्यालय, कॉलेज देखील आहे.परिसरातून येणारे टार्गट तरूणांचा बाजार पेठेत वावर मोठया प्रमाणात आहे. शाळा, विद्यालय,कॉलेज सुटल्यानंतर रोड_रोमियोंची गर्दी रस्त्याने पाहायला मिळत आहे.त्यात मुलींना टार्गेट करत टोमणे मारणे,शिट्टी मारणे,नको ते अश्लील हावभाव करत मुलींकडे पाहण्याचे प्रकार होत आहेत.

त्यात यापूर्वी अल्पवयीन मुलींचे अपहरण, महिलांचा विनयभंग,अत्याचार सारख्या गंभिर घटना घडल्या आहेत.तरी पोलिस प्रशासनाने या सर्व प्रकारांचा योग्य पद्धतीने बंदोबस्त करावा. अशा विकृत प्रवृत्तींना आळा बसविण्याची मागणी येथील नागरिक करत आहे.

Leave a Comment