शिवसेना पक्ष आणि चिन्हबाबत मोठी अपडेट समोर 

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सोमवारी (दि.१८) सर्वोच्च न्यायालयात हाेणारी सुनावणी पुन्‍हा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत ठाकरे गटाकडून वेळ मागण्‍यात आला.

आता तीन आठवड्यानंतर यावर सुनावणी हाेणार आहे. दरम्‍यान, विधानसभा अध्‍यक्षांनी अपात्र आमदारांबाबत घेण्‍याच्‍या निर्णयाची सुनावणी सुरु झाली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत ठाकरे गटाकडून वेळ मागण्‍यात आला. यावर न्‍यायालयाने तीन आठवड्यांची मूदत दिली आहे. त्‍यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर तीन आठवड्यांनंतर सुनावणी हाेणार आहे.

Leave a Comment