अजित पवार गटाचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा अजित पवारांसह शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलं आहे. या टीकेनंतर अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

राज्यात विविध ठिकाणी अजित पवार गटाने आंदोलन केलं असून पडळकरांवर कारवाईची मागणी केली आहे.

पुण्यासह अकोला आणि इतर काही ठिकाणी अजित पवार गटाने गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन केलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.

गोपीचंद पडळकरांना आवर घालावी, अन्यथा आम्ही सत्तेत आहोत, हे विसरून जाऊ, अशा शब्दांत मिटकरींनी इशारा दिला.

Leave a Comment