दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नगर दक्षिण जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड, या तालुक्यांमध्ये गुरूवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.
यातील अनेक ठिकाणी दोन तासांपेक्षा अधिक वेळ पाऊस बरसत होता. यंदाच्या पहिल्याच दमदार पावसामुळे बळीराजाच्या मनावरील ताण काही प्रमाणात हलका होणार आहे.
दरम्यान नगर शहरात रात्री 9 च्या सुमारास रिमझिम पावसाला सुरूवात झाली असून रात्री उशीरापर्यंत पाऊस कोसळत होता.
