नागरदेवळे वडारवाडी येथे विकास कामांचा शुभारंभ आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न  

राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत आहे नागरदेवळे, वडारवाडी, बाराभाबळी या गावांचा विकास कामे भाजपच्या गलिच्छ राजकारणामुळे थांबले होते परंतु आता गेल्या अडीच वर्षापासून येथे टप्प्याटप्प्याने विकास कामे मार्गी लावत आहोत भाजप सरकारने कानडे राजकारण करू नये विकासावर काम करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावे नागरदेवळे वडरवाडी बाराभाबळी येथील नगरपरिषद बाबत आम्ही न्यायालयात लढत आहोत मतदार संघाच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा घेऊन त्यामध्ये जिंकून नगर परिषदेचे माध्यमातून विकास कामे जलद गतीने करू असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले 

 नागरदेवळे येथे आ.प्राजक्त तनपुरे व जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्या विशेष प्रयत्नातून नगर तालुक्यातील नागरदेवळे या वडारवाडी ₹.१ कोटी ४ लक्ष विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला यामध्ये नागरदेवळे येथील देशमुख मंगल कार्यालय ते बुऱ्हाणनगर रोड डांबरीकरण ४५ लाख,गौतमनगर येथे मोबाईल टॉयलेट व्हॅन ८ लक्ष,

जयमाता प्रतिष्ठान, द्वारकाधीश कॉलनी येथे सभा मंडप ६ लक्ष वडारवाडी ते केकती रोड डांबरीकरणाचे काम २५ लक्ष,

वडारवाडी येथील धर्मीयांच्या सार्वजनिक स्मशान भूमीचा विकास काम१० लाख, वडारवाडी येथ पाथरे घर ते साळवे घर रस्ता काँक्रीटकरण १० लाख ,यावेळी राज्य मंत्री आ.प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, वडारवाडी सरपंच संदीप तागडकर,नगरसेवक योगीराज गाडे,तालूका अध्यक्ष रोहिदास कर्डीले, उपतालुकाप्रमुख सुशिल कदम,निखिल शेलार, राजेंद्र भगत,भिंगार बँक चेअरमन अनिल झोडगे,व्हा. चेअरमन किसन चौधरी,सोसायटी चेअरमन किसन धाडगे, व्हा.चेअरमन योगेश धाडगे, संतोष धाडगे,शिवाजी खरपुडे,गणेश काटकर,समीर पठाण,मोसीन पठाण, जहीर सय्यद पत्रकार,विठ्ठल धाडगे,मयुर सोनावणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे म्हणाले की नागरदेवळे, वडारवाडी, बारा बाबळी या गावांचा विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जसे जसे निधीची उपलब्धता होईल तसे तसे टप्प्याटप्प्याने विकास कामे मार्गी लावू. घाणेरडे राजकारण न करता विकास कामे हाच आमचा अजिंठा राहील सर्व नागरिकांना सोबत घेऊन विकास कामे करू असे ते म्हणाले

Leave a Comment