शिक्षण भरती (Teacher Recruitment) करावी यामागणीसाठी तरुणाने मुंबईतल्या मंत्रालयामध्ये (Mantralaya) आंदोलन केले. या तरुणाने थेट मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले.
यावेळी या तरुणाने जोरदार घोषणाबाजी देखील केल्या. पोलिसांनी (Mumbai Police) सुरक्षा जाळीवर उडी मारून या तरूणाला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक भरती करावी या मागणीसाठी बीडच्या आंबाजोगाई येथून आलेल्या तरुणाने मंत्रालयात आज आंदोलन केले. लवकरात लवकर शिक्षण भरती करण्यात यावी अशी मागणी या तरुणाने केली आहे. हा तरुण उसतोड कामगार आणि प्रकल्पग्रस्त असल्याने असल्याचे सांगितले जात आहे.
या तरुणाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालयामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मंत्रालयातील पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरक्षा जाळीवर उडी मारत या तरुणाला बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
