ताशी किमान 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे, जोरदार मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील तीन दिवस राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणेसह कोकणातील सिंधुदुर्ग, विदर्भातील सर्वच जिल्हे आणि मराठवाड्यात 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
‘या’ जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’
पुणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ, वाशिम, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे.
