Maharashtra Job : महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे.
राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये दीड लाख पदांची भरती केली जाणार आहे.
राज्यातील आदिवासी शासकीय शाळातील 1500 कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला, असे पवार यांनी सांगितले.
