शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विम्याबद्दल मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी विम्याची 25 टक्के रक्कम मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ज्या -ज्या मंडळामध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडलेला आहे, असे जे मंडळ आहेत त्याची माहिती घेतली आहे. काही मंडळाच्या संदर्भात विमा कंपनीच्या अडचणी होत्या त्या सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवल्या आहेत.

त्यामुळे दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिली जाईल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment