बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, जुन्नरमधील घटना

आळे (ता. जुन्नर) गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शिवांश भुजबळ (वय साडेतीन वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

आळे गावातील तितरमळ्यात रहात असलेले अमोल भुजबळ यांचा शिवांश अंगणात आजोबांबरोबर खेळत असताना अचानक समोरील उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने या मुलावर हल्ला केला.

बिबट्याने त्याला उसाच्या शेतात फरफटत नेले. या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरुणाने मोठी हिम्मत दाखवत बिबट्याच्या मागे पळत जाऊन त्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यातून सोडवले.

परंतु या हल्ल्यात लहान बालक गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर आळेफाटा येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.

Leave a Comment