भारत – पाकिस्तान हायव्होल्टेज मुकाबला, कधी सुरू होणार सामना

आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत शनिवारी १४ ऑक्टोबर २०२३ रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना खेळविण्यात येणार आहे.

हा सामना जगातील सर्वात मोठ्या मौदानावर म्हणजेच अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी २:०० वाजता खेळवण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाने सलामीच्या दोन्ही लढतीमधे ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाला पराभूत केले आहे.आता पाकिस्तान संघाला पराभूत करून स्पर्धेतील आपला तिसरा विजय संपादन करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला संधी मिळणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाने नेदरलँड्स आणि श्रीलंका संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला पराभूत करून आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताविरुद्ध आपला पहिला विजय संपादन करण्यासाठी पाकिस्तान बाबर आझमच्या नेतृत्वात इतिहास रचण्यासाठी उतरणार आहे.

Leave a Comment