राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
कालच मंत्री छगन भुजबळ यांना आली जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आला आहे. उद्या मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी छगन भुजबळ यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
मंत्री छगन भुजबळ यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यामुळे भुजबळांच्या नाशिकमधील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल जीवे मागण्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या वाढदिवसानिमित्ताने पोलीस बंदोबस्त राहणार आहे. वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांना भेटायला येणाऱ्या लोकांची तपासणी केली जाणार आहे. छगन भुजबळ यांच्या थेट जवळ जाण्यासाठी मनाई असणार आहे.
आजपासूनच भेटायला येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. भुजबळांना धमकी आल्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
