संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या सहा वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली होती.
दरम्यान सहा वर्षांनंतर तक्रारदार ठेवीदारांना दिलासा मिळाला असून अहमदनगर जिल्हा तक्रार निवारण आयोगाने ठेवीदारांच्या बाजूने निकाल दिल्याने पतसंस्थेच्या संचालक मंडळात खळबळ उडाली आहे.
तसेच तक्रारदार ठेवीदारांना ठेवी व्याजासह ३० दिवसांच्या आत संचालक मंडळाने देण्याचे आदेश जिल्हा तक्रार निवारण आयोगाने दिले आहे. दरम्यान संचालक मंडळाच्या यादीत चक्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकच पतसंस्थेचे संचालक असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे त्या शिक्षकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
कारण जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या निकालानंतर आता तक्रारदार ठेवीदार त्या शिक्षक संचालकांविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची मोठी बातमी समोर आलीय. लवकरच तक्रारदार ठेवीदार थेट शिक्षणमंत्र्यांना भेटणार असल्याच समोर आलय.
