मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा वैजापूर येथे दोन वाहनांच्या धडकेत १२ जण ठार तर १८ जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या अपघातात मृत्यू आणि जखमी प्रवाशांची यादी समोर आली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे-
तनुश्री लखन सोळसे (०५), संगीता विलास अस्वले (४०), पंजाबी रमेश जगताप (३८), रतन जमदाडे(४५), काजल सोळसे (३२), रजनी गौतम तपास (३२), हौसाबाई आनंदा शिससाट (७०), झुंबर काशिनाथ गांगुर्डे (५८), अमोल गांगुर्डे (१८), सारिका गांगुर्डे (४०), मिलिंद पगारे (५०), दीपक केकाने (४७).
जखमींची नावे-
पुजा सिंदीप अस्वले (३५), वैष्णवी सिंदीप अस्वले (१२), ज्योती हदपक के काणे (३५), कमलेश दगु म्हस्के (३२), सिंदीप रघुनाथ अस्वले (३८), युवराज पवलास साबळे (१८), कमलबाई छबु मस्के (७७), संगीता दगडु म्हस्के(६०), दगु सखदेव म्हस्के (५०), लखन सोळसे (२८), गिरजेश्वरी अस्वले (१०), शांताबाई मस्के (४०), अनिल साबळे (३२), तन्मय कांबळे (८), सोनाली त्रिभुवन (२५), श्रीहरी केकाणे (१२), सम्राट केकाणे (६), गौतम तपासे (३८), कार्तिक सोळशे (५), धनश्री सोळसे (८), संदेश अस्वले (१२), प्रकाश गांगुर्डे (२४), शंकर (३). या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यासमोर पहाटे दीड वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत हे नाशिक शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
