World Cup 2023 : टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्यासाठी किती सामने जिंकावे लागणार,वाचा…

World Cup 2023 Semi-Finals: आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाची कामगिरी उत्तम सुरु आहे. टीम इंडियाने ( Team India ) या स्पर्धेत सलग 3 सामने जिंकले आहे.

रविवारी झालेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. यामुळे वर्ल्डकप स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया 6 पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे. टीमचं रनरेटही +1.821 इतकं आहे. त्यामुळे आता सेमीफायनल ( World Cup 2023 Semi-Finals ) गाठण्यासाठी टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागतील शिवाय त्याचं गणित कसं असणार आहे, हे पाहूयात.

दहा टीम्स असलेल्या या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये सर्व टीमना एकदा एकमेकांशी भिडावं लागणार आहे. त्यानंतर पॉईंट्सच्या अव्वल स्थानी असलेल्या चार टीम्स उपांत्य फेरीत प्रवेश करतील. यामध्ये जर भारताला उपांत्य फेरीतील आपलं स्थान पक्कं करायचं असेल तर त्याला 9 पैकी 7 सामने जिंकावे लागतील.

सध्याच्या परिस्थितीत टीम इंडियाने 3 सामने खेळले असून या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आता उरलेल्या 6 सामन्यांमध्ये कोणतीही अडचण न येता सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करायचं असेल तर टीम इंडियाला ( Team India ) अजून केवळ 4 सामने जिंकावे लागणार आहेत.

Leave a Comment