शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी 31 ॲाक्टोबरला होणार होती. दरम्यान निवडणूक रोखे (इलेक्ट्रोल बॉंड) संदर्भात सुनावणी असल्यानं पक्ष चिन्हाची सुनावणी पुढे ढकलल्याचे वृत्त समोर आले आहे.
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिले होते. याविरोधात ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणुक आयोगासमोर सुनावणी झाली. शिवसेना पक्षावर दावा करण्यासह शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तीवाद संपला आहे.
