आमदार निलेश लंके हे भविष्यात लोकसभा निवडणुका लढवू शकतील अशा चर्चा वारंवार होत असतात. यावर देखील आमदार निलेश लंके यांनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यावेळी वरिष्ठांकडून मला तसा आग्रह केला जात होता.
त्यामुळे मी लोकसभा मतदारसंघांची चाचपणी देखील करत होतो. पण त्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आलं. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकांबाबत माझी वरिष्ठांसोबत चर्चा झाली नाही. वरिष्ठांनी जबाबदारी दिली तर ती आम्ही पार पाडू असंही यावेळी निलेश लंके यांनी म्हटलं आहे.’
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे निलेश लंके यांचा चेहरा लोकसभा निवडणुकांमध्ये दिसणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
