हवामान विभागाने वर्तविला ‘हा’ अंदाज 

राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्याने तडाखा दिल्याने उन्हाची ताप, उकाडा वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे.

आज (ता. १८) राज्यात ढगाळ हवामानसह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशाच्या बहूतांश भागातून मॉन्सून परतला आहे. राजस्थान, हरियाणामध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगतची चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. अंदमान समुद्रातील चक्राकार वाऱ्यांपासून ते तामीळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Leave a Comment