संगमनेर : सरपंचानंतर बिरेवाडी ग्रामपंचायतीचा सदस्यही देणार राजीनामा, मोठं कारण समोर…… 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील एक ग्रामपंचायत सदस्य राजीनामा देणार असल्याची मोठी बातमी समोर आलीय. याला कारणही असच आहे.

मराठा आरक्षणासाठी बिरेवाडी ग्रामपंचायतीचा एक सदस्य राजीनामा देणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच गेल्या दोन महिन्यांपूर्वी विद्यमान सरपंचांनी देखील राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त आहे.

सरपंचपदाची निवड अजून होणे बाकी असताना एक सदस्य मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. परंतु सदर ग्रामपंचायत सदस्य नेमका सत्ताधारी शेतकरी गटाचा आहे की विरोधी जय बजरंग बली गटाचा हे अजून अधिकृत समोर आले नाही.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. या लढ्याला सर्व समाज बांधव एकत्र येऊन बळ देण्याचं काम करत आहेत. मराठा आरक्षणासाठी समाज बांधव एकजूट करून मनोज जरांगे पाटील यांना ताकद देण्याच काम करत आहेत.

तसेच मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र काढत पदांचे राजीनामे दिले आहे. त्यातच बिरेवाडी ग्रामपंचायतीचा एक सदस्यही मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार आहे. तसेच तो सदस्य लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे देखील समोर आलय.

Leave a Comment