मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले पवारांकडे तेव्हाच…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांच्याबाबत पुन्हा एकदा गौप्यस्फोट केले आहेत. 2019 साली ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद कसं मिळवलं, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खळबळजनक दावा केला आहे.

शिवसैनिकाला पालखीत बसवणार, पण हे महाशय टुनकन खुर्चीत जाऊन बसले. पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, अशी शिफारस केली.

2004 पासून तुम्ही प्रयत्न करत होता, पण जुगाड लागत नव्हता. 2019 चे निकाल लागले, तसं सगळे दरवाजे उघडे असल्याचं म्हणाले, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

‘आता तिकडे शिमगा मेळावा, टोमणे सभा सुरू असेल, त्यांनी दसरा मेळावा शिमग्याला घ्यायला पाहिजे. कोरोना काळात मी पीपीई कीट घालून फिरत होतो, तेव्हा तुम्ही पैसे मोजत होतात, बॉडी बॅगमध्ये घोटाळा, खिचडीमध्ये घोटाळा, कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा.

इर्शाळवाडीत आलात आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसलात निघून गेलात. 26 जुलैला वांद्र्यात पाणी भरलं होतं, बाळासाहेबांना पाण्यात ठेवून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलात. जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत, ते तुमचे काय होणार,’ अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी केली.

Leave a Comment