आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

 

धनु : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. खर्चाचे खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मीन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

Leave a Comment