नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना, सख्ख्या चिमुकल्या भावांचा मृत्यू

अहमदनगर टाकळी काझी (ता. नगर) येथील एका कुटुंबातील तीन लहान मुलांना अन्नातून विषबाधा झाली. त्यातील दोन बालकांचा मृत्यू झाला असून एक मुलावर उपचार सुरू आहेत.

शिवराज बापू म्हस्के (वय-साडेचार वर्ष), स्वराज बापू म्हस्के (वय- दीड वर्ष) या दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर सार्थक भाऊसाहेब म्हस्के (वय-१४) याच्यावर उपचार सुरू आहेत.

रात्री 8 नऊ च्या दरम्यान स्वराज बाप्पू म्हस्के वय14 महिने याचा मृत्यू झाला ही बाब जिल्हा परिषद सदस्य शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले याना समजल्यावर त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन पालकांना पुढिल बाबी साठी मदत केली.

यावेळी शिवसेना नेते शंकर ढगे, अशोक ढगे,सरपंच शहाजी आटोळे,हर्षल म्हस्के ,डॉ करांडे,संदीप गावडे,पप्पू गावडे, अरुण म्हस्के व अनेक ग्रामस्थ यांनी रुग्णालयात धाव घेतली तालुका पोलीस स्टेशन चे भानुदास सोनवणे यांनी वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पंचनामे करून सहकार्य केले.

Leave a Comment