मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप निर्णय आलेला नाही. शिंदे यांच्यासह आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.
एकनाथ शिंदे अपात्र होतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका दावा केला आहे त्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार नाहीत, मात्र अपात्र झाले तरी शिंदे विधानपरिषदेचे आमदार होऊन मुख्यमंत्रीपदी कायम राहणार, असा दावा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना केला आहे.
“एकनाथ शिंदे अपात्र होतच नाही. ते झाले तरी देखील विधानपरिषदेवर येऊ शकतात. पण आम्ही कायद्याने सर्वकाही केले आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही. उद्धव ठाकरे हे उर्वरित पक्ष वाचवण्यासाठी ते लोकांना आशा दाखवत आहेत.
हे सरकार पूर्णवेळ चालणार आहे. बी प्लानची गरज नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील.”, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.
