शरद पवारांचा शिंदे गटानंतर भाजपला धक्का……

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा आपला करिश्मा दाखविण्यास सुरवात केलीय. शरद पवार यांच्या गटातील 8 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कालच अपात्रतेची नोटीस पाठविण्यात आली होती.

मात्र, त्याला शरद पवार गटाने फार गांभीर्याने घेतले नाही असे दिसतंय. शरद पवार यांनी शिंदे गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना पक्षात प्रवेश देत एकनाथ शिंदे यांना शह दिला.

त्यापाठोपाठ एका माजी मंत्र्याला राष्ट्रवादीत प्रवेश देत भाजपलाही धक्का दिलाय. या माजी मंत्र्यांला पक्षप्रवेश दिल्यामुळे भाजप आणि अजितदादा गटाचीही शरद पवार यांनी मोठी कोंडी केलीय.

लातुर जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या मतदारसंघाचे विनायक पाटील यांनी प्रतिनिधित्व केले होते. विनायक पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द कॉंग्रेसमधून केली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते सहकार मंत्री होते.

Leave a Comment