पारनेर(DSNews24/किरण पुरी) मराठा आंदोलक मनोज जरांगे गेली ५ दिवसापासून मराठा आरक्षणासाठी अन्न पाण्याशिवाय अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती पूर्णतः खालावली आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी देसवडे ग्रामस्थांच्या वतीने रात्री ८ वाजता मेणबत्त्या पेटुन गावात प्रभात फेरी काढण्यात आली या वेळी गावातील लहान मुलांसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या गावो – गावी मराठा आरक्षणासाठी मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना आपण निवडून दिलेले आमदार, खासदार हे सध्या बघ्याची भुमिका घेत आहेत अशी खंत या वेळी भूमिपुत्र संघटनेचे संतोष वाडेकर यांनी वेक्त केली.
सध्याचे सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी बघायची भूमिका घेत असल्यामुळे उद्या मंगळवार दिनांक ३१ रोजी सकाळी ठीक ९ वा. सर्वपक्षीय मराठा आमदार खासदार यांचा अंत्य विधी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले व जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी उपसरपंच सचिन भोर, माजी सरपंच बाबा भोर, विशाल वाडेकर, दत्ता फटांगरे, संतोष फटांगरे, मंजबापू वाडेकर, शुभम टेकुडे, बाबासाहेब वाडेकर, अण्णा भोर,बंडू गोळे, काशिनाथ गोळे, संतोष गोळे, संतोष भोर, संकेत भोर, तेजस भोर, बाळासाहेब वाडेकर, अश्विनी भोर शारदा भोर, आशा वाडेकर, दुर्गा वाडेकर, इंदुबाई भोर, विद्या फटनगरे , शीतल वाडेकर , ताराबाई भोर, मीराबाई वाडेकर, शोभा वाडेकर, हिराबाई वाडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
