अहमदनगर ब्रेकिंग! ओढ्यात गाडी उलटली, ५ जणांचा मृत्यू 

नेवासा तालुक्यातील नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटानजिक असलेल्या घाडगे ओढ्यात गाडी उलटून झालेल्या अपघातात ५ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.२९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.

या अपघातात एक चिमुकली बचावली. मयतांमध्ये आणखी एका चिमुकली सह तीन महिला व चालकाचा समावेश आहे. अपघातात मृत पावलेल्या तीन महिला संगमनेर तालुक्यातील जांबुत खुर्द येथील रहिवासी असुन दोन जण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील येथील रहिवासी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांसह नेवासा फाटा परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यासाठी मदत केली.

हायवेवर पडलेल्या टायरला धडकून चारचाकी गाडी त्रिमूर्ती शाळेच्या ओढ्यात पलटी झाली. या अपघातात वसीम हारूण मुल्ला (वय ४१) , अनसुरा बेगम हारूण मुल्ला (वय ४१) हे राहणार संभाजीनगर व रेश्मा हारूण पठाण (वय ३५) ,हसीना हारूण पठाण (वय ५४), सामीया रेश्मा पठाण (वय १४) सर्व रा. जांबुत खुर्द ता. संगमनेर हे मृत पावले असून मासुमा हलदार मोमीन हलदार (वय १३) ही मुलगी या अपघातातून बचावली आहे.

संभाजीनगरचे हारूण अमीर मुल्ला यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०४ अ, २७९,४२७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment