मनोज जरांगे पाटलांचा सरकारला शेवटचा अल्टिमेटम….

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. जरांगे यांच्या उपोषणाला प्रतिसाद देण्यासाठी राज्यभर मराठा बांधव ठिकठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत.

अशात जरांगे पाटील यांनी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. उद्या विशेष अधिवेशन बोलावून सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

उपोषण स्थळावरून जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सरकराने घेतलेला एकही निर्णय मान्य नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हंटले. तसेच उद्याच विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली. तसेच उद्यापर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा पाणित्याग करणार असल्याचा इशारा देखील यावेळी जरांगे पाटील यांनी दिला.

जरांगे पाटील यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे –

सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलवावं

सरकारने घेतलेला एकही निर्णय मान्य नाही

गरीब एकाही मुलावर गुन्हा दाखल केला तर मी बीडमध्ये येईल

मी बीडला आलो तर मराठे काय असतात हे तुम्हाला कळेल

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या

महाराष्ट्रात ५० टक्के मराठा समाज आहे

अर्धवट निर्णय आम्हाला मान्य नाही

Leave a Comment