अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनीही माझ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे.
यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता प्रतिक्रियाही येत आहेत. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनीही प्रतिक्रिया दिली.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, अजित पवार यांच वय लहान आहे. मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा असणे हे काही गैर नाही. पण शेवटी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत.
त्यांच्याच नेतृत्वात पुढची निवडणूक लढवली जाणार आहे, अजितदादांचे वय लहान आहे त्यांना पुढच्या काळात संधी मिळू शकते, असंही मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
