बिग ब्रेकिंग! एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईत आणले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती कळताच त्यांनी खडसे यांना मुंबईला आणण्यासाठी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली असून, त्यांना आता जळगावहून मुंबईत आणले जाणार आहे.

Leave a Comment