अहमदनगर ब्रेकींग! ‘या’ ग्रामपंचायतींचा धक्कादायक निकाल 

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत सरपंच पदाचा निकाल लागला आहे. याठिकाणी काॅंग्रेस गटाचे काका जठारे यांची सरपंच पदी वर्णी लागली आहे.

तर जिल्ह्यातील दोन निकालामध्ये एक काॅंग्रेसकडे तर एकावर शरद पवार गटाचा विजय झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

संगमनेर तालुक्यातील आश्वि बुद्रूक ग्रामपंचायतीत बाळासाहेब थोरात गटाचा विजय झाला असून याठिकाणी नामदेव किसन शिंदे यांची सरपंच पदी निवड झाली आहे. तर आश्वि खुर्द ग्रामपंचायतीत विखे गटाचा विजय झाला असून महसूलमंत्री विखे पाटील यांच्या स्विय्य सहाय्यकाच्या पत्नीचा विजय झाला असून अलका बापूसाहेब गायकवाड विजयी झाल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं खातं उघडलं आहे. याठिकाणी अजित लकडे जनतेतून सरपंचपदी विराजमान झाले आहेत. तर संगमनेर तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायत मध्ये विखे गटाचा विजय झाला असून याठिकाणी सरपंचपदी नितीन म्हतारबा आहेर विजयी झाल्या आहेत.

दरम्यान, अहमदनगरमध्ये कर्जत – जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे. कुंभेफळ आणि खेडगावात भाजपचा सरपंच, तर केवळ एका जागेवर करमणवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकाचा विजय झाला आहे. यातच संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा ग्रामपंचयातीमध्ये थोरात गटाची सत्ता, सरपंचपदी सोनाली संदीप कर्पे विजयी झाले आहे. यापूर्वी थोरात गटाची सत्ता आली आहे.

Leave a Comment