मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हातून स्वत:च्या गावचे सरपंचपद निसटले आहे. त्यांच्या आंबेगावातील निरगुडसर गावचे सरपंचपद शिंदे गटाने खेचून आणले आहे. सरपंचपदासाठी शिंदे गटाचे रवी वळसे १३५ मतांनी विजयी झाले आहेत.
रवी वळसेंना १४८३ तर पवार गटाचे संतोष टावरेंना १३४८ मते मिळाली. इथे १३ पैकी १० जागांवर पवार गटाचे तर अवघ्या ३ जागांवर शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले.
