IMD : राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पुढील ३ दिवसांत राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णता आहे. त्यामुळे विचित्र प्रकारचं वातावरण सध्या पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरली आहे.
तर पिक भुईसपाट झाली आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिसकावला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १३ मार्चपासून मध्य भारताच्या काही भागात, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांसह आसपासच्या भागात हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर IMD GFS मॉडेल व extended range अंदाज या भागांत आणि पूर्व किनार्यावर गडगडाटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
