बिरेवाडी येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा साकूर व आळेफाटा ठरला विजेता

संगमनेर : तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येथे १० मार्च रोजी शिवजयंती निमित्त भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेत अनेक शाळांसह विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

या डान्स स्पर्धेत मोठा व छोटा असे दोन गट पाडण्यात आले होते. यामध्ये मोठा गटातून आळेफाटा येथील कलाविष्कार गृपने प्रथम क्रमांक पटकाविला तसेच छोट्या गटातून साकूर येथील आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला.

मोठ्या गटातून द्वितीय क्रमांक – मयुर ताजणे / प्रभाकर सागर सर, तृतीय क्रमांक – स्वराज पवार, चतुर्थ क्रमांक – श्रृती वाडेकर, पाचवा क्रमांक – पायल कढणे / कोमल ढेंबरे, सहावा क्रमांक – प्रतिक्षा कोळपे व सातवा क्रमांक – संचिता ढेंबरे यांनी पटकाविले.

तर छोट्या गटातून द्वितीय क्रमांक – काव्यांजली डोलनर, तृतीय क्रमांक – धृवी खताळ अकोले, चतुर्थ क्रमांक – आरोही केंगार, पाचवा क्रमांक – श्रेजल गवळी / जिल्हा परिषद शाळा बिरेवाडी गावठाण, सहावा क्रमांक – अलिशा सय्यद / वाडेकर गृप, सातवा क्रमांक – वैष्णवी भोसले यांनी पटकाविले. या सव विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तसेच रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे पर्यवेक्षकाचे काम प्रविण मिसाळ, विजय भोसले, संदिप पर्बत यांनी पाहिले. स्पर्धेचे दोन्ही गटातील सातही नंबर गुणांवर आधारित काढण्यात आले.

दरम्यान, स्पर्धेत मोठ्या गटातील स्वराज पवार या स्पर्धकाने ठसकेबाज लावणीवर नृत्य करत उपस्थितांची दाद मिळवली. तसेच प्रभाकर सागर सर यांनी केळेवाली गाण्यावर अनोखे नृत्य सादर केले तर कलाविष्कार गृपचा डान्स स्पर्धेत डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. तसेच इतर स्पर्धकांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करत आपली कला सादर केली. त्यामुळे स्पर्धकांनी उपस्थितांबरोबर बिरेवाडीकर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

तसेच शिवजयंतीचे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अचूक नियोजन करण्यात आले होते. शिवनेरी किल्ल्याहून सकाळी शिवज्योतीचे उत्साहात आगमन झाले. तसेच भव्य मिरवणूकीसह मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तसेच तसेच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. त्यानंतर डान्स स्पर्धा उत्साहात पार पडली. डान्स स्पर्धेसाठी दानशूर दात्यांनी बक्षीसे देत मदत केली. तसेच डान्स स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती, समस्त ग्रामस्थ बिरेवाडी व ओम साई गृप बिरेवाडी यांनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेचे सुत्रसंचलन संकेत ताजणे यांनी केले. यावेळी साकूर पठारभागासह विविध तालुक्यातील हजारो प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.

Leave a Comment