राज्यात सोमवारी ५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. शिंदे सरकारने विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी अर्थात १३ नोव्हेंबरला दिले आहेत.
शिंदे सरकारच्या आदेशात अधिकारी आशीष शर्मा, प्रवीण पुरी, दीपक तावरे, विकास पानसरे आणि अमन मित्तल यांच्या नावाचा सामावेश आहे.
यामध्ये मंत्रालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव IAS प्रवीण पुरी(2011) यांची पुणे येथे दिव्यांग विभागाच्या आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
