संगमनेर(DSNews24) तालुक्याच्या साकूर पठारभागात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे.
तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथील धनगर वाडा या ठिकाणी सभामंडपासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नुकतेच या कामाचे भूमिपूजन जांबुतचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आलय.
या भूमिपूजनावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, रउफ शेख, गुलाबराजे भोसले, लक्ष्मण कुलाळ, संदिप बुरके, संतोष शेटे, इसाक पटेल, अजित कुलाळ, सुरेश पारधी, रमेश शेटे, शांताराम शेटे, आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
