BREAKING! दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

SSC GD Recruitment 2023 Apply Online: तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने एसएससी जीडी भरतीअंतर्गत सीआयएसएफमध्ये मध्ये कॉन्स्टेबलच्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे.

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल, तर ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जे उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते 31 डिसेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. ऑनलाइन फी भरण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2024 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत, सीआयएसएफमध्ये एकूण 11,025 पदं भरली जाणार आहेत. तुम्हीही या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

 

या गोष्टी लक्षात ठेवा

ऑनलाइन अर्जप्रक्रियेची सुरुवात : 24 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

 

फी भरण्याची शेवटची तारीख : 1 जानेवारी 2024

‘अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो’आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याच्या तारखा : 4 जानेवारी ते 6 जानेवारी 2024

 

पात्रता

परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून मॅट्रिक किंवा इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षांदरम्यान असावी.

 

निवडप्रक्रिया

उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा (CBE), शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), वैद्यकीय चाचणी आणि दस्तऐवज पडताळणीच्या आधारे केली जाईल. संगणक आधारित परीक्षा (CBE) आयोगाकडून इंग्रजी, हिंदी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल.

 

अर्ज करण्यासाठी लिंक : https://ssc.nic.in/

अधिसूचना : https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/Notice_24112023.pdf

 

अर्ज करण्यासाठी शुल्क

यासाठी अर्ज करण्यासाठीची फी ₹100/-आहे. आरक्षण असलेल्या महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. भीम यूपीआय, नेट बँकिंग, व्हिसा , मास्टरकार्ड, माइस्ट्रो, रूपे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून ऑनलाइन पद्धतीने फी भरू शकता.

Leave a Comment